३० वर्षांनंतर एकत्र येत माजी विद्यार्थ्यांकडून शालेय आठवणींना उजाळा
ढुमेवाडी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
पुरंदर :
शाळेचे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात करिअरसाठी जातात. शालेय जीवनात एकत्र भेटलेले विद्यार्थी कधी भविष्यकाळात भेटतील याची शाश्वती नसते. परंतु पुरंदर तालुक्यातील पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे १९९२ ते ९४ साली ११ वी ते १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याकाळी शिकवलेल्या गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सकाळी पुरंदर जूनियर कॉलेजमध्ये एकत्रित जमून त्या काळात घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर ढुमेवाडी येथील वैभव हॉटेलमध्ये नियोजित कार्यक्रम संपन्न केला. यावेळी सर्वांनी शिक्षण व शिक्षकांप्रती भावना व्यक्त केल्या.
यावेळी पुरंदर कॉलेजचे प्राचार्य आय.आर. सय्यद, राष्ट्रपती पारितोषिक विजेते प्राचार्य ए. बी. सुळगेकर, प्रा.आर.के. पाचुपते, प्रा.एस.जी. थोरात, प्रा.एस.के.हराळे, प्रा.एस.बी. देशपांडे, प्रा.सी.जी. सदाकळे, प्रा.एच.एल. काळभोर, प्रा.के.जे. मांडवेकरआदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान विभागात सन १९९२ ते ९४ साली शिक्षण घेतलेले सुनील लोणकर, अरुण खेनट, संतोष झेंडे, दादासाहेब कटके, भाऊसाहेब जगताप, सचिन कोंडे, राहुल मोरे, शरद बोबडे, रविंद्र कुंभार, स्नेहल खेनट, शबाना मुल्ला, प्रिया मोरे, चित्रलेखा केसकर, मनिषा खोमणे, भाग्यश्री शिणगारे, विद्या बोरावके, शितल चौधरी, रविंद्र कांबळे, संतोष झेंडे, संजय थोरात, अंजली ओदेल, अविनाश धायगुडे, मेघा शिंदे, रमेश लडकत, हरिश्चंद्र जाधव, मंगेश राऊत, मनिषा जगताप, मंगल कदम, इरफान मुल्ला, भूषण पवार, राजेंद्र राऊत, रशीद शेख, भारती पाटील, घनश्याम कामठे, संजीवनी वाघमोडे, शिवाजी खेडेकर, अशपाक बागवान, संतोष कामथे, किशोर आबनावे, देवेंद्र बारभाई, राहुल सागर, वैशाली झेंडे, शबाना मोकाशी, वैशाली गोळे, नंदा गायकवाड, प्रकाश का. फडतरे, प्रकाश पां.फडतरे, शांताराम सुतार, रविंद्र काळे, रामदास ताम्हाणे, उज्वला पवार, विकास जगताप, धनंजय गाडेकर, अर्पिता कादबाने, प्रकाश कामठे, संगिता झगडे, मिनाक्षी कामठे, शैला इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षक वृंदांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण खेनट व संतोष झेंडे यांनी केले. अनुमोदन घनश्याम कामठे यांनी दिले. सूत्रसंचालन सुनील लोणकर व चित्रलेखा केसकर यांनी केले. आभार दादासाहेब कटके यांनी मानले.
यावेळी दिवंगत झालेल्या संजय हिंगमिरे, कल्पेश कालवडीया, रुपेश चिंबळकर, सुजित न्हालवे या विद्यार्थ्यांना सर्वांनी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पुरंदर गोल्डन केराओके ग्रुप राम दहिवाळ, शरद बोबडे, सुजाता गुरव, शुभांगी महामुनी, वर्षा भालेराव यांनी सादर केलेल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली.
प्रिया मोरे व संतोष झेंडे यांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळीने कार्यक्रमांमध्ये रंगत आली. प्रिया मोरे हिने सादर केलेल्या नृत्याला अनेकांनी दाद दिली. संजय थोरात, भाऊसाहेब जगताप, संजीवनी वाघमोडे, चित्रलेखा केसकर यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर केली. सचिन कोंडे, राहुल मोरे, मंगेश राऊत, अविनाश धायगुडे यांनी नियोजन केलेल्या फेट्यांमुळे सर्वजण आनंदित झाले.
दादासाहेब कटके यांनी सर्वांना अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली. भाऊसाहेब जगताप, धनंजय गाडेकर, संतोष कामथे, रमेश लडकत यांनी आर्थिक संयोजन केले. मंगेश ढवळे यांनी फोटोग्राफीचे उत्तम नियोजन केले. मनिषा खोमणे हिचा आर्थिक हातभाराबद्दल सन्मान करण्यात आला. आदर्श उपक्रमाशील शिक्षिका भाग्यश्री शिणगारे -दिवटे यांनी सर्व मित्र मैत्रिणींच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त केले.
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिलेल्या सुनील लोणकर, अरूण खेनट, संतोष झेंडे यांचा दादासाहेब कटके व मित्रपरिवाराने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
स्नेह मेळाव्यात एकमेकांच्या भेटीगाठी बरोबर अनेक आठवणींचा ठेवा उराशी बाळगून परत भेटण्याचा संकल्प करत सर्व विद्यार्थ्यांनी
एकमेकांचा निरोप घेतला.