पुरंदर विधानसभा निवडणुकीतील आपला उमेदवार किती शिकलाय?
सोमवारी कोण अर्ज मागे घेतय
पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत शुक्रवारी २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. पैकी उद्या सोमवारी कोण अर्ज मागे घेतय हे पाहणे आता औत्सुक्याचे असणार आहे. या २६ उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे हे वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे. २६ उमेदवारांपैकी एकाचे शिक्षण ४ थी, एकाचे ६ वी एकाचे ८ वी पास, १३ उमेदवार १० वी १२ तर १० उमेदवारी उच्च शिक्षित आहेत.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्जा सोबत शपथ पत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता समोर येत आहे. आपला उमेदवार किती शिकलाय हे यामुळे सर्वसामान्य मतदारांना समजणार असून योग्य उमेदवाराला मतदार मतदान करतील.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नाव व शिक्षण. दत्तात्रय झुरंगे १२ वी पास, शंकर हरपळे (२) १० वी नापास, विशाल पवार ८ वी पास, सुरज घोरपडे बी.ए., गंगाराम माने १० वी पास, आकाश जगताप १२ वी पास, किर्ती माने एम.ए, बी.एड., संजय निगडे १२ वी, संजय जगताप बी.कॉम, ई.एम.बी.ए.(बॅंकींग), उमेश जगताप १० वी नापास, बळीराम कुलकर्णी १० वी पास, संदिप उर्फ गंगाराम जगदाळे १० वी पास, संदिप मोडक १२ वी पास, अभिजित जगताप डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरींग, सुरज भोसले १२ वी पास, अनिल गायकवाड १२ वी नापास, दिगंबर दुर्गाडे बी.कॉम, एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. (२०१२- २०१७), अतुल नागरे ४ थी पास, संभाजी झेंडे बी.एस.सी.ॲग्री, एम.एस.सी. ॲग्री, एल.एल.बी., दिलीप गिरमे कृषी पदवी अपुर्ण, विजय शिवतारे डि.एम.डी, डि.एम.इ, गणेश जगताप एफ.वाय. बी.ए, जालिंदर कामठे बी.कॉम, एम.कॉम, महादेव खेंगरे पाटील ६ वी पास, उत्तम कामठे १२ वी नापास, शेखर कदम बी.कॉम, एम.कॉम, डि.टी.एल, आयसीडब्ल्यू, डॉ.उदयकुमार जगताप बैचलर ऑफ होमिओपैथिक मेडीसीन ॲड सर्जरी, बैचलर ऑफ लॉज, सुरेश वीर जुनी एस.एस.सी
(११ वी).