पुरंदरमध्ये 418 मतदान केंद्राकरिता 2, 145 कर्मचारी.
पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रशिक्षण संपन्न
पुरंदर :
पुरंदर विधानसभा मतदारसंघ दि. 11 व 12 नोव्हेंबर 2024 रोजी आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे मतदान अधिकारी कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के निवडणूक नायब तहसीलदार श्रीम. गोंजारी, प्रशिक्षण समन्वयक श्रीम. वाघ व मतदान अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षण दि.11 नोव्हेंबर रोजी दोन सत्रांमध्ये (सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 2 ते 5) या वेळेमध्ये व 12 नोव्हेंबर रोजी एका सत्रात सकाळी 10 ते 12 या वेळेत अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले. सादर ठिकाणी चौकशी कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष, टपाली मतदान कक्ष तसेच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी करता अठरा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये 18 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याची घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
मतदार प्रक्रिया सुरळीत होण्याकरिता पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावरील कामकाजासाठी एकूण 2145 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुरंदर विधानसभा मतदार संघामधील एकूण 418 मतदान केंद्राकरिता विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्रअध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3, अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या विविध 418 टीमस् तयार करण्यात आलेल्या आहेत.
मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी घ्यावयाची काळजी जसे की मतदान साहित्य प्राप्त झाल्यानंतर तपासून घेणे व मतदान केंद्रावर गेल्यावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडताना घेण्याची खबरदारी, मॉक पोल घेणे, तसेच मतदान पार पडल्यानंतर मशीन पुन्हा जमा करणे इत्यादी संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.
मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणालाही स्मार्टघड्याळ, सेल फोन, कॉर्ड लेस फोन, वायर लेस संच वापरण्यास परवानगी नाही. तसेच निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची आव्हान करण्यात करण्यात आले.
पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधील अधिकारी कर्मचारी यांची प्रशिक्षण घेण्यात आले आहे व आम्ही येणारी निवडणूक पार पडण्याकरिता सज्ज आहोत असे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले.