संभाजी झेंडे यांच्याकडून एनसीपी अजित पवार गटाचा एबी फॉर्म सादर : आबासाहेबांना घड्याळ चिन्ह
पुरंदर विधानसभा निवडणुकीत २८ उमेवारंनी ४० अर्ज दाखल केले : १०३ अर्जांची विक्री
पुरंदर :
पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी ४० अर्ज सादर केले आहेत. आमदार संजय जगताप यांनी आज मंगळवारी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करत मोठी सभा घेतली. आज शेवटच्या दिवशी संभाजी झेंडे यांनी एनसीपी अजित पवार गटाचा एबी फॉर्म निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. महायुतीतून काल शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेच्या एबी फॉर्म दाखल केला आहे. यामुळे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत वाटत असली तरी काटशहच्या या राजकीय खेळीत झेंडेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे.
आज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे. 1) विशाल अरुण पवार (अपक्ष), २) संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे(भाजपा, अपक्ष), ३) शंकर बबन हरपळे( अपक्ष शिवसेना उबाठा), ४) जगताप अभिजीत मधुकर (अपक्ष), ५) अनिल नारायण गायकवाड (अपक्ष), ६)संदीप बबन मोडक (अपक्ष), ७) उमेश नारायण जगताप (मनसे), ८) संजय शहाजी निगडे (राष्ट्रीय समाज पक्ष), ९) बळीराम काळूराम सोनवणे (आर पी आय), १०) कीर्ती शाम माने (वंचित बहुजन आघाडी ) ११) गंगाराम सोपान माने (आरपीआय ए आंबेडकर), १२) आकाश विश्वनाथ जगताप (अपक्ष), १३) सुरज राजेंद्र घोरपडे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), १४) संजय चंद्रकांत जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), १५) दत्तात्रय मारुती झुरांगे (अपक्ष), १६) सुरज संजय भोसले (बहुजन समाज पक्ष) असे १६ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत २८ उमेदवारांनी ४० नामनिर्देशन पत्र पुरंदरच्या निवडणूक कार्यालयात दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच मंगळवारी १) सुरज राजेंद्र घोरपडे, २) दत्तात्रेय मारुती झुरंगे, ३) आकाश विष्णू बहुले या ३ उमेदवारांकडून ५ अर्ज खरेदी करण्यात आले आहेत.