सासवड येथे मोटरसायकल आणि कारचा अपघात
अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी
सासवड दि.६
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर सासवड जवळ मोटरसायकल आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर रित्या जखमी झालेले आहेत
या संदर्भात स्थानिक प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बोरावके मला येथे आज मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजलेच्या दरम्यान जेजुरी बाजूकडून येणारी बुलेट क्रमांक एम एच 42 bk 9952 आणि सासवड बाजूकडून राख या गावाकडे निघालेली ईरटीगा कार क्रमांक एम एच 12 wu 6367 यांच्या मध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटरसायकल वरील दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सासवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. यांदर्भात राख येथील सोमनाथ रामचंद्र सुर्वे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे .....