Type Here to Get Search Results !

🚨 नदिकाठच्यांना धोक्याचा इशारा 🚨 वीर धरणातून हंगामातील सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग

 🚨 नदिकाठच्यांना धोक्याचा इशारा 🚨

वीर धरणातून हंगामातील सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग





पुरंदर :
     नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास वीर धरातून या हंगामातील उच्चांकी ४७ हजार ०२१ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाढता पाऊस पहाता कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवला जाऊ शकतो याची खबरदारी म्हणून नीरा नदिच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


रविवार दि. ०४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७९.५३ मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तसेच आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता वीर धरणाच्या वरील भागातील निरा देवघर धरण(९५.२७%),भाटघर धरण १००% तर गुंजवणी धरण(९०.००%)भरलेली असल्याने व या सर्व धरणांतून विसर्ग पुन्हा वाढल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४१ हजार ७३३ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता ४५ हजार ७७१ क्युसेक्स करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. याद्वारे विनंती करण्यात येते कि, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी अशा सुचेना कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग,फलटण,जिल्हा सातारा यांनी दिल्या आहेत.

नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग
दिनांक-4-8-24(11:00 am)
भाटघर.   =22631 Cusecs
नीरा देवघर =7060 Cusecs
गुंजवणी    =3597  Cusecs
--------------------------------
एकुण   = 36885   Cusecs
-----------------------------------
वीर*       = 47021 Cusecs
_______________________________________________

*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*
*दिनांक-4-8-24(12:00 pm)*
*भाटघर*. =22631 Cusecs
*नीरा देवघर*=7060 Cusecs
*गुंजवणी* =3597 Cusecs 
--------------------------------
*एकुण* = 36885 Cusecs 
-----------------------------------
*वीर*- = 47021 Cusecs

_______________________________________________

*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*
*दिनांक-4-8-24(12:30 pm)*
*भाटघर*.   =22631 Cusecs
*नीरा देवघर*=7060 Cusecs
*गुंजवणी*    =3597  Cusecs 
--------------------------------
*एकुण*   = 36885   Cusecs 
-----------------------------------
*वीर*-       = 55097 Cusecs

_______________________________________________

*नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग*
*दिनांक-4-8-24(3:00 pm)*
*भाटघर*. =26131 Cusecs
*नीरा देवघर*=7060 Cusecs
*गुंजवणी* =4282 Cusecs 
--------------------------------
*एकुण* = 37473 Cusecs 
-----------------------------------
*वीर*- = 63173 Cusecs


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies