Type Here to Get Search Results !

घाट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणे फुल, नद्यांना पुर, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.

Top Post Ad

 घाट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणे फुल, नद्यांना पुर, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.





पुरंदर:
      पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. सर्व धरणे जवळपास पूर्ण भरली असल्यामुळे येणारे सर्व पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदितीरावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक तहसीलदार व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून, आवश्यक गावात सूचना द्यावी व उपाययोजना कराण्या याव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

        नीरा नदिवरील सर्व धरणे १०० टक्के भरल्याने धरणातून मोठ्याप्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारी रात्री १० वाजता नीरा देवघर मधून ५ हजार ५१३ क्युसेक्सने, भाटघर मधून १४ हजार ०६१ क्युसेक्सने, गुंजवणी मधून २ हजार १७४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने वीर धरणात २४ हजार ७४८ क्युसेक्सने पाणी येत आहे. त्यामुळे वीर धरणातून ४२ हजार ९८३ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदिकाठच्या शेतात किंवा लोकवस्तीत पाणी येऊ शकते. अशा धोकेदायक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सतर्कता घेत विपरीत घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले होते. 

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies