Type Here to Get Search Results !

वीर धरणाच्या सांडव्यातून विक्रमी विसर्ग नीरा नदी धोक्याची पातळीवर : २०२२ सालचा १ लाख क्युसेक्सचा विक्रम मोडतोड का?

 वीर धरणाच्या सांडव्यातून विक्रमी विसर्ग


नीरा नदी धोक्याची पातळीवर : २०२२ सालचा १ लाख क्युसेक्सचा विक्रम मोडतोड का?




पुरंदर :
    पुणे व सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता ६३ हजार २७३ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. रात्री तो कमी केला. आज रविवारी दिवसभर ३३ हजार ८०९ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. सायंकाळच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात आला असुन आता नऊ वाजल्यापासून या हंगामातील विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक्सने सुरू, रात्री पुन्हा विसर्ग वाढला जाऊ शकतो. त्यामुळे आता नीरा नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

     रविवारी सकाळी ०६ वाजता २४ हजार ५३५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत राहिला परिणामी सकाळी ०७ वाजता नीरा देवधर धरणातून ५ हजार १०५ क्युसेक्सने, भाटघर धरणातून ९ हजार ३३१ क्युसेक्सने तर गुंजवणी धरणातून ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. त्यामुळे वीर धरणात १५ हजार १६९ क्युसेक्सने पाणी येत होते. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग वाढवून तो ३३ हजार ८०९ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर दुपारी ०१ वाजता वीर धरणातून २४ हजार ५३५ विसर्ग करण्यात आला. दिड वाजता पुन्हा विसर्ग वाढवून ३३ हजार ८०९ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. ०४.३० वाजेपर्यंत तो विसर्ग तसाच ठेवला होता. सायंकाळी ०५.३० वाजता नीरा देवधर धरणातून ६ हजार २३६ क्युसेक्सने, भाटघर धरणातून ११ हजार ४३१ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून २ हजार ४३३ क्युसेक्सने विसर्ग केल्याने वीर धरणात २० हजार १०० क्युसेक्सने पाणी येत असल्याने वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ४३ हजार ०८३ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला. ०६.३० वाजता वीर धरू ४७ हजार १२१ क्युसेक्सने, ०७ वाजता ५५ हजार १९७ क्युसेक्सने, रात्री ०७.३० वाजता ६३ हजार २७३ क्युसेक्सने, तर रात्री ०८.४५ वाजता ७१ हजार ३४९ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला आहे. या पावसाळी हंगामातील हा विक्रमी विसर्ग असलेल्याचे बोलले जात आहे.

  नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट सन २०२२ साली विक्रमी पाऊस झाल्याने वीर धरणातून तब्बल १ लाखांहून अधिक क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला होता. तो विक्रमी विसर्ग यावर्षी पुन्हा मोडतोड का हे नीरा नदीच्या काठावरील शेतकरी लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies