Type Here to Get Search Results !

पुरंदर मधिल वैद्यकीय सेवा २४ तास बंद राहणार

पुरंदर मधिल वैद्यकीय सेवा २४ तास बंद राहणार




पुरंदर :
 
   कोलकाता येथील तरुण चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीवर क्रूरपणे बलात्कार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांत वैद्यकीय सेवा बंद ठेऊन निषेध नोंदवणार असल्याचे पुरंदर मेडिकल एसोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

         ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.

      या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन केले आहे.

       अत्यावश्यक व आपात्कालीन  सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील. ह्या बंद मधे पुरंदरमधिल सर्व डॉक्टर्स सहभागी झालेले आहेत.
त्यामुळे पुरंदरमधील सर्व डॉक्टरांचे अत्यावश्यक व आपत्कालिन सेवा व्यतिरिक्त इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद रहातील याची सर्वांनी नोंद घ्यावी व सर्व नागरिकांना याची कल्पना द्यावी असे आवाहन पुरंदर मेडिकल एसोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies