नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई
विदेशी मद्यासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
नीरा ( ता.पुरंदर ) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाद्वारे कारवाई करून लाखो रुपयांचा अवैध मध्ये साठा जप्त करण्यात आला आहे निरा येथील संत ज्ञानेश्वर पालखीतळाच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली आहे तर या संदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नीरा गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी जप्त करण्यात आला आहे.त्याच बरोबर हा मध्यासाठा वाहतुकीसाठी वापरलेले वाहन ही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपत्पदान शुल्क विभागामार्फत अशा प्रकारची कारवाई करण्याची पुरंदर तालुक्यातील आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी सासवड येथे अशी कारवाई करण्यात आली होती.
नीरा- लोणंद मार्गावर नीरा येथील पालखीतळाजवळ वाहनांच्या तपासणीदरम्यान अशोक लेलॅण्ड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलच्या चारचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच ०३- सीव्ही ९४६८ मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ७ हजार ६८० बाटल्या असलेले १६० खोके जप्त करण्यात आले. वाहनातील इसमांकडे मद्य वाहतुकीसंदर्भातील कोणतेही परवानगीपत्र, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी.टी. कदम, एस.एस.पोंधे, ए.आर. थोरात, एस.सी.भाट, आर. टी. तारळकर, शशांक झिंगळे व महिला जवान यु.आर. वारे तसेच वाहनचालक ए. आर. दळवी यांनी सहभाग घेतला असून,या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील हे करीत आहेत.