साताराच्या जिल्हाधिका-यांनी माऊलींच्या नीरास्नान घटाकडे फिरवली पाठ
- नीरा नदीच्या जुन्या ब्रिटीश कालीन पुलाची पाहणी करूनच जिल्हाधिकारी परतले
नीरा
सातारा जिल्ह्यात माऊलींचा पालखी सोहळा ६ जुलैला प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभुमीवर
माऊलींच्या स्वागताची तयारीचा आढावा घेण्यासाठी साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सोमवारी ( दि.१)पाडेगांव (ता.खंडाळा) हद्दीतील नीरा नदीच्या ब्रिटिश कालीन जुन्या पुलाची पाहणी केली .माञ माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्तघाटावर नीरा स्नान घातले जाते त्या स्थळाकडे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पाठ फिरवली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आषाढी पायी वारीत माऊलींच्या पादुकांना
पुणे - सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीतील पविञ तीर्थांनी नीरा स्नान घालण्याची
गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत विशेष महत्व आहे. दरवर्षी सातारा जिल्हा प्रशासनाकडून माऊलींच्या नीरा स्नानाच्या तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी सोमवारी (दि.१) सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशीन नटराजन यांच्यासह महसुल व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी पाडेगांव ( ता. खंडाळा) येथील नीरा नदीच्या जुन्या ब्रिटीश कालीन पुलाची पाहणी केली. तसेच माऊलींच्या नीरा स्नानाच्या स्थळाची पाहणी करण्याची कोणतीच उत्सुकता न दाखविता पाठ फिरवित परतले. परिणामी यंदा सातारा जिल्हा प्रशासनाला माऊलींच्या नीरा स्नानाचे महत्वच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.