पुण्यात सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, पाच जणांवर गुन्हा, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश
June 10, 2024
0
आंबेगाव, पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चौघानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे त्यांनी त्या घटनेचा विडिओ तयार करून दुसऱ्याला पाठवला.त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणी आता चौघाविरोधात पारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, दोन अल्पवयीन मुले, सर्व रा. धामणी ता. आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून दोघीं अल्पवयीन बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो दुसऱ्याला दिला होता. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ पीडित अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघी मावस बहिणी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या .काही दिवसापूर्वीच त्या सुट्टीला गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस करत आहे.
Tags