Type Here to Get Search Results !

माळशेज घाटात रिक्षावर कोसळली दरड, चुलता पुतण्याचा जागेवर मृत्यू, आई वडिलांनी डोळ्यादेखात गेले प्राण

जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात पावसाळा सुरुवात झाली आहे. त्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई येथे राहात असलेले कुटुंबं आपल्या मुलगावी म्हणजे संगमनेर येथे रिक्षाने जात असताना माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. आई वडिलांच्या डोळ्यादेखत आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालबाल बचावला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे. राहुल भालेराव ( वय 37) आणि स्वयंम भालेराव ( वय 6) या काका पुतण्याचा जागेवरच मृत्यू झाला असून आई वडील आणि थोरला भाऊ यातून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा मधून एम.एच. ०३ डी. एस. ३२११ चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी जातं होते. मात्र, माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षामध्ये बसलेल्या चुलता पुतण्याच्या अंगावर अचानक भला मोठा दगड कोसळला आणि मोठा अनर्थ झाला. यात सोयंम भालेराव, राहुल भालेराव या दोघांचा जागीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (५८),वडील बबन भालेराव वय (६२) व भाऊ सचिन भालेराव (४०) सर्व रा. घाटीपाडा नं २ वाळकाबाई चाळ बिहार रोड योगीहील मुलुंड प. मुंबई नं ८० हे थोडक्यात बचावले आहेत. बराच वेळ हा अपघातात झाल्याचे लक्षातच आले नाही. कारण रिक्षाला काहीच झाले नाही. फक्त वरच्या कापडं फाटले आणि दगड थेट दोघांच्या डोक्यात पडला. मात्र आई आणि वडिलांनी स्वतःच्या डोळ्यादेखात आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसंकडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies