Type Here to Get Search Results !

कोथळे अवैध गावठी हातभट्टी दारूवर धडक कारवाई ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त : डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे व जेजुरी पोलीस स्टेशनची कारवाई

 कोथळे अवैध गावठी हातभट्टी दारूवर धडक कारवाई


६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त :
डी.वाय.एस.पी. तानाजी बरडे व जेजुरी पोलीस स्टेशनची कारवाई





पुरंदर :

       जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोथळे गावचे हद्दीत ओढ्‌याचे कडेला शेजारी झाडा झुडपाच्या आडोशाला गावठी हातभटटी दारू तयार करण्याची भट्टी मिळून आली आहे. संशयित अवैध हातभट्टी चालक संतोष राठोड याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत फिर्याद दाखल करून भट्टीवर धडक कारवाई करण्यात आली आहे. भोर पुरंदर उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सोमेश राऊत यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये  फिर्याद दाखल केली आहे.

        याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.०६) रोजी रात्री १२ च्या सुमारास उपविभागिय पोलीस अधिकारी भोर तानाजी बरडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जेजुरी नजिकच्या मौजे कोथळे गावचे हद्दीत कोणीतरी एक इसम ओढ्‌याचे कडेला शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला गावठी हातभटटी दारू तयार करत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे हे जेजुरी पोलीस स्टेशन येथे दाखल होवुन स.पो.नी दिपक वाकचौरे व पोलीस कर्मचारी यांना दालनात बोलावुन हातभट्टीवर छापा टाकुन कार्यवाही करणे बाबत माहीती दिली. त्यानंतर खाजगी वाहनाने बातमी ठिकाणी जावुन अलीकडे उभे करून पायी लपतछपत जावुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता एक इसम कोथळे येथील ओढ्याचे कडेला शेजारी झाडाझुडपाच्या आडोशाला भट्टी लावुन त्यावर एक मोठे लोखंडी भांडे ठेवुन खालुन जाळ लावुन शेजारी असणारे दोन लोखंडी पातेल्या मध्ये असलेले कच्चे रसायन काठीच्या साहयाने ढवळत असताना दिसला. त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो पळून जावु लागला त्यास राऊत ओळखुन संतोष थांब असा आवाज दिला. त्याने पाठीमाघे वळुन पाहुन तसाच पुढे अंधाराचा व झाडाझुडपाचा फायदा घेवुन तेथुन पळून गेला.

पोलिसांनी या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी प्रत्येकी १० हजार लिटरचे तीन लोखंडी पातीली, त्यामध्ये ३० हजार लिटर दारूचे कच्चे रसायन, बाजुला एक टण सरपण, व भटटीच्या बाजुला ३५ लिटरची ६ प्लास्टिक कॅन्ड त्यामध्ये एकुन हातभट्टीची २१० लिटर तयार दारु, पातीले झाकण्यासाठी लागणारी थाळी, एक छोटी पाण्यातील मोटर रसायन उपसणेसाठी, एक चाटु, असा माल मिळुन आला.

      सदर अज्ञात इसम याने गावठी हातभट्टीने मानवी जिवितास हानी होवुन धोका होऊ शकतो हे माहीत असताना गुंगीकारक अंमली गावठी हातभटटीची तयार दारू करण्यासाठी लागणारे कच्चे रसायण व गावटी हातभटटीची तयार दारू करीत असताना दिसुन आला व पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. छापा टाकला ती वेळ ००.४५ वाजताची होती. घटनेच्या ठिकाणी मिळुन आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे

1) 6,00,000/- रु कि 3 लोखंडी पातीली त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 30,000 लिटर कच्चे रसायन

2) 1200/- रु कि. पातीले झाकण्यासाठी लागनारी थाळी.

3) 1 टन लाकडी सरपणसाठी रु. 10,000/-

4) 5000 /- रु कि, एक छोटी पाण्यातील मोटर रसायन उपसणे साठी जु.वा.किं.अं.

5) 21,000/- रु.कि.भटटीच्या बाजुला 35 लिटरची 6 प्लास्टिक कॅन्ड त्यामध्ये एकुन हातभट्टीची 210 लिटर तयार दारु

6) 100/- रु किं एक चाटु दारु काढण्यासाठी वापरला जाणारा.

असा एकूण 6,34,300/- रु. किंमतीचा येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल मिळून आला. कारवामध्ये दोन पंचांच्या समक्ष पो.स.ई. तारडे यांनी एक ८० मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळ्या बाटली रसायन व एक १८० मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळ्या बाटली तयार दारू, एक चाटु, एक पाण्याची मोटार, असे जागीच जप्त करून सील करण्यात आला. जप्त गावठी हातभटटीची तयार दारू व गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच जे.सी.बी च्या साहयाने पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आले आहे. यावरुन संतोष राठोड पुर्ण नाव माहीत नाही रा. धालेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे विरुध्द भा.द.वि.क 326 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई तारडे, पो. ना. सोमेश राऊत यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies