Type Here to Get Search Results !

नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ.

 नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख 


पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ. 



पुणे : 

      ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढील काळात कार्यरत होणार आहे. स्थानिकांकडून पत्रकारांना त्रास दिला जातो. या पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा संघाच्या कार्यकारणी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करावे. नवनियुक्त पदाधिकार्यांनी प्रत्येक महिन्याला एका तालुक्यातील सदस्यांसोबत बैठक घेऊन मराठी पत्रकार परिषद आपल्या पाठीशी खंबीर असल्याचा विश्वास देणे गरजेचे आहे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले. 


       मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि.१७) मधुबन लॉन्स, कवडीपाठ ता. हवेली, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हर्चुएल) पद्धतीने लंडन येथून मार्गदर्शन करत नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी , परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, मुंबई विभाग अध्यक्ष राजा आदाटे, श्रीराम कुमठेकर आदी उपस्थित होते. 


      पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल लोणकर, परिषद प्रतिनिधी पदी ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, जिल्हा संघटक पदी अनिल वडघुले (जबाबदारी - शिरुर, हवेली, खेड, आंबेगाव जुन्नर, मावळ), जिल्हा संघटक पदी चिराग फुलसुंदर (पिंपरी चिंचवड + पुणे शहर परिसर), जिल्हा संघटक पदी सुर्यकांत किंद्रे (जबाबदारी - भाेर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड ), उपाध्यक्ष पदी सचिन कांकरीया (जुन्नर-आंबेगाव), हनुमंत देवकर - (चाकण - मावळ), मदन काळे (शिरूर, दौंड, खेड), चिंतामणी क्षिरसागर (बारामती - इंदापूर), रमेश निकाळजे (हवेली - पुरंदर), संतोष म्हस्के (भोर, वेल्हा, मुळशी), सरचिटणीस पदी सतिश सांगळे, सहचिटणीस पदी किरण दिघे, कोषाध्यक्ष पदी प्रा. संतोष काळे, सहकोषाध्यक्ष पदी संजय शेटे, कार्यालयीन चिटणीस पदी जीवन शेंडकर, जिल्हा समन्वयक पदी मारुती बाणेवार, रविंद्र वाळके, प्रवक्ता म्हणून सावता झोडगे (आंबेगाव), जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन मेदनकर, सहप्रसिध्दी प्रमुखपदी रोहित नलावडे, वरीष्ठ जिल्हा सल्लागार म्हणून नितिन बारवकर, संतोष वळसे, रमेश वत्रे, ज्ञानेश्वर रायते, संजय इंगुळकर, दत्तानाना भोंगळे, श्रीराम कुमठेकर, नाथाभाऊ उंद्रे, पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रकपदी बी. एम. काळे, पुणे जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी पदी सुनिल भांडवलकर, जिल्हा निवडणुक निरीक्षकपदी सुनील वाळुंज, सारंग शेटे, दत्ता भालेराव, रविंद्र पाटील, जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी किरण भदे (भोर), ए.टी. माने (पुरंदर), अमर गायकवाड (चाकण),  सुनील जाधव (बारामती), रोहित वाघमोडे (इंदापूर), सुनील शिरसाट (हवेली ), सुरेश भुजबळ (जुन्नर), विश्वास दामगुडे (वेल्हा), दत्ता बांदल, बापु पाटील (मावळ), राजेश नागरे (आळंदी), सुनिल पवार (प्राधिकरण), महिला जिल्हाध्यक्षपदी श्रावणी कामत, समन्वयकपदी रेखा भेगडे, सचिवपदी छाया नानगूडे, कोषाध्यक्ष पदी सुजाता गुरव, कार्यकारणी सदस्य म्हणून वर्षा चव्हाण, पुणे शहर अध्यक्षपदी बाबा तारे, शहर उपाध्यक्षपदी मंगेश कुमार हिरे, शहर सरचिटणीसपदी प्रमोद गव्हाणे, शहर कोषाध्यक्षपदी धनराज खंडाळे यांना व्यासपीठावरिल मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व तुळशीरोप देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान हवेली तालुका अध्यक्षपदी स्वप्नील सुभाष कदम यांची नियुक्ती करण्यात आली. 


      पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचा वतीने करण्यात आले होते. हवेली तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक होते. तर मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील तेरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर तालुका अध्यक्ष संजय बारहाते, खेड तालुका अध्यक्ष सुनील थिगळे यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार व परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी केले. नवनियुक्त पदाधिकार्यांना मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, मुंबई विभाग अध्यक्ष राजा आदाटे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले तर आभार पुणे जिल्हा सोशल मीडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी मानले. 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies