भरधाव कारची धडक महिलेला उडाली हवेत, थोडक्यात बचावली, नियंत्रण सुटल्याने कार गेली दुकानात, कार चालकावर गुन्हा
June 12, 2024
0
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सिसिटीव्ही आता समोर आला असून या अपघातातील महिला थोडक्यात बचवाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा अपघातात 23 मे रोजी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात २३ मे २०२४ रोजी ही महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने त्या महिला पाठीमागून जोरात धडक दिली. तयामुळे महिला जोरात उडून पडली. कारवरील चालकाचा ताबा सुटलेली कार ही पुन्हा एका दुकानात शिरली.
त्यानंतर या अपघाताचे सिसिटीव्ही व्हायरला झाला आणि हा प्रकार समोर आला आहे. या. घटनेतनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना संपर्क केला. मात्र, आपली कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. तसेच, संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.
या घटनेचे सिसिटीव्ही समोर आल्यानंतर पुण्यातील पोर्शे अपघाताची आठवण ताजी झाली. या घटनेची पॉलिसीकडून कोणतीही दाखल तातडीने घेण्यात आली नासक्याचस आरोप नागरिकांडून करण्यात आला. या घेटनेनंतर संबंधित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याने गुन्हा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रनेला जाग आली असून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.