Type Here to Get Search Results !

भारतातील युवा वर्गापर्यंत आदि गुरु शंकराचार्यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची विशेष मोहीम

पुणे : ब्रिटीश संसदेतील 'युनायटेड किंग्डम' येथील 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बहुसांस्कृतिक कार्यक्रमात 'सनातन धर्माचे महान शिक्षक, गुरु आणि तत्वज्ञ आदि गुरु शंकराचार्य' यांनी रचलेले आध्यात्मिक ग्रंथ असलेल्या 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' या शृंखलेच्या सांगितीक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. आज पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' व आदि गुरु शंकराचार्य लिखित 'सौंदर्य लहरी'चे सादरीकरण - लोकार्पण आणि याविषयीची माहिती पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवालजी आणि कविता पौडवाल यांनी पत्रकारांना दिली. जगाला सनातन धर्माची ओळख करुन देणे हे अनुराधाजींचे ध्येय आहे, आजच्या तरुणाईपर्यंत आदि गुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी आखली असून याची सुरुवात पुणे येथून करीत असल्याचे त्या म्हणाल्या. पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या 'वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य' या नवीन संगीत श्रृंखलेचे अनावरयाप्रसंगी करण्यात आले, आदिशंकराचार्यांच्या तत्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणी मुळे वेदांच्या शुध्द शिकवणीचा उपयोग राजांसह अगदी सामान्य व्यक्तीला ही होतो. भारतातील सर्वोत्कृष्ट ज्ञान, हे परकीय आक्रमणकर्ते आणि सामान्य माणसापासून दूर जाऊ लागले होते व त्यातील अनेक भ्रामक कल्पनाही जनसामान्यांमध्ये रुजल्या होत्या, परिणामी समाज आपल्या ध्येयापासून भरकटू लागला होता. आदि शंकराचार्यांनी वेदामधील ज्ञान दिले ज्यामुळे भौतिक आणि अध्यात्मिक यश प्राप्त करणे शक्य होते. ते एक परंपरावादी होते, त्यांनी परंपरांना सौम्य केले नाही किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला नाही पण त्याच बरोबर ते देव उपासक म्हणून मूळचा अभिमान राखून ठेवला. असे पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल सांगतात. या गोष्टी विषयी चर्चा करतांना अनुराधाजी म्हणाल्या "सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते. पण सत्य हे आहे की हे तत्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तंत्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने, सुसंवाद आणि सर्वसमावेशक पध्दतीचा प्रसार करतात. त्यांची शिकवण ही मानसिक शांतता, अध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणिमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते. या मुल्यांचा प्रसार करुन त्यांची शिकवण ही जगभरांतील विविध संस्कृतींनी एकाच मंचावर एकत्र येऊन एकमेकांचा सन्मान आणि समजून घेण्यावर भर दिला जातो. जगभरांतील प्रेक्षकांसमोर शांतीचा आणि एकतेचा हा संदेश प्रसारीत करण्यासाठी मी वचनबध्द आहे.” *अनुराधा पौडवाल यांच्याविषयी* श्रीमती अनुराधा पौडवाल यांची गेल्या ५० वर्षांची उल्लेखनी कारकीर्द आहे, या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना भारतीय संगीत आणि अध्यात्मातील त्यांच्या योगदाना बद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी १५ भाषांतील १० हजारांहून अधिक गाणी गायली असून आजपर्यंत त्यांचे १५०० हून अधिक भजन अल्बम्स प्रकाशित झाले आहेत. सनातन धर्माचा प्रसार हा त्यांनी जीवनभर इतरांचे उत्थान आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेल्या प्रोत्साहपर कार्याची पुढची पायरी आहे. त्यांनी नेहमीच संस्कृती आणि अध्यात्मिकतेचा दीप प्रकाशमान ठेवला असून जगभरातील लोकांना आधुनिक विचारांबरोबर परंपरागत ज्ञान कसे जगावे हे शिक्षण त्यांच्याकडून मिळत आहे. त्यांनी सनातन धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करण्यास वाहून घेतले असून जगाला शांतता, सौहार्द आणि अध्यात्मिक वाढीच्या वैश्विक तत्वांनी जवळ आणण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies