पुण्यात कंपनीची भिंत कोसळली..! एका कामगाराचा मृत्यू, तीन कामगार जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
June 19, 2024
0
पुणे : शिरूर रालुक्यातील कोरेगाव भिमा येथील डिंग्रजवाडी असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंगभिंत कोसळल्याने एकाचा जागेवर मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.
राजीव कुमार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंजित कुमार गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुकायत डिंग्रजवाडी येथे असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळ आज
सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाच्या सुमारास कंपनीची भिंत कोसळली. कंपनीची भिंत पडल्याने कामासाठी कामगार दबले गेले आहेत. यात एका कामगारांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत ०९ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले.
या घटनेचा पंचनामा पोलिसनाकडून केला जात आहे. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला असून त्यात भिंत कोसळल्याचे पहायला मिळत आहे. यात मृत झालेला कामगार आणि जखमी झालेले कामगार पर प्रांतीय असल्याची माहिती समोर येत आहे.