सासवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा, आमदार संजय जगताप यांना निवेदन
June 18, 2024
0
सासवड : सासवड येथील कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत आज आमदार संजय जगताप यांना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. पुढील आठवडय़ात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करून तालुक्यातील तसेच सासवड शहरातील वीज वितरणा संदर्भातील अपूर्ण कामे ४/५ दिवसांमध्ये पुर्ण न केल्यास पुरंदर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पुरंदर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन महाजन सासवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार जगताप यांनी निवेदन दिले. यावेळी सासवड शहर काँग्रेस पक्षाचे खजिनदार नितिन भोंगळे, सा. कार्यकर्ते मुन्ना शिंदे, सासवड शहर असंघटित कामगार सेलचे उपाध्यक्ष सागर जगताप, बेलसर गण युवक अध्यक्ष अतिश जगताप,विद्यार्थी कॉंग्रेस उपाध्यक्ष कुलदीप कोंडे, शुभम खेंगरे, सुनिल रिठे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.