मुख्यमंत्र्याना संयुक्त बैठक घ्यायला भाग पाडू : शरद पवार यांची पुरंदरवासियांना ग्वाही
June 12, 2024
0
वाल्हे : प्रश्न सोडवायचा असेल तर काही लहान थोर प्रकल्प गेल्या काही दिवसापासून प्रलंबित राहिले आहेत. आपण पुरंदर उपसा योजनेचे काम काही प्रमाणात केले. त्याच्यातही काही प्रमाणात कमतरता आहे. त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे, याकरिता राज्य सरकारने काही गुंतवणूक करायला हवी. तसेच गुंजवणीच्या प्रश्नाबाबत अनेकांची भाषणे झाली. त्याची मान्यता माझ्या सहीने झाली. त्याचे भूमिपूजन माझ्या उपस्थितीत झाले. पण आपल्याला जे हवंय त्याची पूर्तता आज होत नाही. ज्यावेळी अशा प्रकल्पांना विलंब लागतो त्यावेळी त्याला फाटे फार फुटतात. त्यासाठी अधिकाधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी ही योजना आहे अशा पद्धतीचा आग्रह झाला पाहिजे ते करण्यासाठी राज्य सरकारला आम्ही भाग पाडू.
याकरिता सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत एक संयुक्त बैठक घ्यायला पार पाडू अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार आज पुरंदर तालुक्यातील दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी शरद पवार म्हणाले कि, गेले काही दिवस पावसाची स्थिती बघितल्यानंतर मला असं वाटलं की दुष्काळाला तोंड द्यावे लागेल, अशी स्थिती दिसते. म्हणून त्या भागात मला जावे वाटले. सरकारला जागे करावे जेवढी व्यवस्था करता येईल ते करायाला सरकाराला भाग पाडायाला हवे. आज थोडा फार पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात एक वैशिष्ट्य आहे मी जिथे जातो तिथे पाऊस पडतो. आताच्या पावसाची जी स्थिती आहे त्याने प्रश्न सुटत नाही चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा आहे.
पुरंदरचा निकाल मतांची आघाडी देण्यात यशस्वी झाला. जेवणा निवडून दिलं त्यांची इथे येण्याची इच्छा होती. मात्र त्यांना आजच परदेशात जावं लागलं. त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आहे. आज त्यांचा पदवी प्रदान समारंभ आहे. आपल्या मुलाच्या पदवी प्रदान समारंभाला हजर राहावं असं मी त्यांना सुचवलं. त्यामुळे इच्छा असूनही सुप्रियाताई आज इथे येऊ शकल्या नाहीत. आज पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेली आहे. पण दहा वर्षाची सत्ता आणि आजची सत्ता यात फार मोठा फरक आहे. दहा वर्ष त्यांच्या हातात स्पष्ट बहुमत होतं आणि समाजातील सर्व धर्माच्या जातीच्या लोकांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु त्यांची निर्णय घेण्याची पद्धत काही लोकांबद्दल मनात आतुष्ट असावा अशी होती. त्यांची काही भाषण झाले की देशाच्या एकजुटीला तळा देणारी झाली.
मोदींच्या भाषणाबाबत...
राज्याच्या प्रमुखाची सर्वांच्या हिताची गोष्ट करणे ही जबाबदारी असते. प्रधानमंत्री यांनी काही ठिकाणच्या भाषणात गोष्टी सांगितल्या. धर्माचा उल्लेख न करता लोकांना समजवण्याचा महत्त्वाचा निकाल त्यांनी दिला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो. त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या बहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून जाईल. असं म्हणण्याचं काहीही कारण नव्हतं.
पक्ष भिन्नता असूनही देशाचा विचार सोडला नाही....
मला राज्याच्या विधानसभेत विधानपरिषदेत लोकसभेत राज्यसभेत जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष झाली. 1967 सालापासून एकही दिवसाचे खड न घेता सलग निवडून आलेला या देशात दुसरा कोणी नाही. या 56 वर्षात अनेक मंत्री पाहिले अनेकांसोबत काम केले. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी सोडला नाही.
मारुतीने पहिला आमदार माझ्या घरी दिला...
अटल बिहारी वाजपेयी यांचा आणि आमचा पक्ष वेगळा होता पण देशाच्या बाबतीत त्यांनी कधी चुकीची भूमिका घेतली नाही. त्यांच्याकडे विचारता राहू दे आता त्यांच्यानंतर ही वेगळी विचारधारा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काही लोक होती काही आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आमदार होतो. तेव्हा माझ्या घरी कोण आमदार नव्हतं पण मारुतीने पहिले आमदारकी माझ्या घरी दिली.