पुण्यात मुख्याधिकाऱ्यानी गाड्यांना उडवले...! वाहनांचे मोठे नुकसान, अधिकाऱ्यांना थेट घरातून घेतले ताब्यात
June 02, 2024
0
मावळ, पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच मावळ तालुक्यातील. तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यानी दोन वाहनांना जोरात धडक दिल्याची घटना घडली आहे. शिवाय धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी ना थांबता घरी निघून गेले. मात्र पोलिसांनी त्यांना चक्क घरात जाऊन ताब्यात घेतले.
मुख्याधिकारी एन. के. पाटील असे या मुख्याधिकर्याचे नाव आहे. मात्र ही धडक त्यांनी मद्यपान केल्याचे अद्याप समोर आले नसले तरी त्याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येथे मुख्याधिकारी पाटील हे स्वतःची खाजगी गाडी चालवत होते. त्यांचा गाडीचा वेग खूप होता. त्यांनी वेगात समोर असलेल्या चारचाकीला आणि आणखी एका वाहनाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यात समोरच्या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुख्याधिकारी घटनास्थळावरून थेट आपल्या घरी गेले आणि दार लावून बसले.
या अपघाताबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट मुख्याधिकर्यांच्या घरी पोहचले. मात्र कारवाईच्या भीतीने त्यांनी काही वेळ दार उघडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नंतर त्यांनी दार उघडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या मद्यप्राशन केल्याची माहिती समोर येणार आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अल्पवयीन मुलांचे प्रमाण यात अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.