AI तंत्रज्ञानाचा वापर करून 70 वर्षीय रुग्णाचा कर्करोग केला बरा...! राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
June 17, 2024
0
पुणे : दिवसेंदिवस जगात नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातच AI हे तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत. असेच AI तंत्रज्ञान वापरून चक्क कर्करोग बरा करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कर्करोग बरा करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून कर्करोगी रुग्णाचा रेडिओलॉजिस्टच्या मदतीने कर्करोग बरा करण्यात आला आहे. राज्यातले हे पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
मावळ येथील एका एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुफुसाचा कॅन्सर झाला होता. त्यांची घरची परिस्थिती फारच हालाखीची होती. त्याने मावळच्या तळेगाव दाभाडे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाने उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या रुग्णाला फुफुसाचा कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाला रेडिएशनच्या मार्फत कॅन्सरची गाठ काढण्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी फुफ्फुसातील या रुग्णाची कॅन्सरची गाठ एआय टेक्नॉलॉजी च्या मार्फत काढली.
या प्रक्रियेला साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर मात्र आता हा सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक रुग्ण ठणठणीत बरा असल्याचे पाहायला मिळत आहे. AI टेक्नॉलॉजी मुळे नोकऱ्या धोक्यात येतील असा एक समज लोकांमध्ये होता. मात्र आता याच एआय टेक्नॉलॉजी मार्फत मेडिकलमध्ये खास करून कॅन्सर रुग्णांसाठी ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्यात यश आल्याने या पद्धतीचा वापर आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात केला जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होइलच. मात्र हे ऑपरेशन यशस्वी झाल्याने कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण ही एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
कर्करोगावर प्रभावी उपचार पद्धती करून या आजारातून बरं करण्याचं कार्य येथील डॉक्टरांच्या टीमला जात असल्यानं ही उपचार पद्धती आजारी व्यक्तीला वरदान ठरत असून त्याचा फायदा नक्कीच कर्करोग्याला मिळताना दिसून येणार आहे.