पुण्यात तरुणाची गोळ्या घालून हत्या ! पिंपरी चिंचवड शहरातील घटना, आरोपी फरार
May 29, 2024
0
पुणे : पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकंवर काढत आहे. त्यातच आज बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दीपक कदम असे त्या तरुणाचे नाव असून तो सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. खून केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी हा गजबजलेला परिसरात या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. या ठिकाणी दीपक हा तरुण उभा होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर पिस्तुलातून फायरींग केले. अचानक फायारिंग झाल्याने त्याला पळायला देखील संधी मिळाली नाही. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रकातच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला चाप बसवण्याचे काम पोलिसांकडून केले जाणे गरजेचे आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात देखील मोठ्या संख्येने गुन्हेगारी वाढताना पहायला मिळत आहे. सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याने काही प्रमाणात या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व वैमस्यातून ही हत्या झाली का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला आहे.