Type Here to Get Search Results !

गोलंदाजी करताना मिलिंद ग्राऊंडवरच कोसळला...! हृदयविकाराचा झटका आल्याने क्षणात सगळं संपल

पुणे : कुणाचं मरण कधी कुठे लिहिलेलं असेल याचा काही नेम नाही. त्यात आजच्या धावपळीच्या युगात या गोष्टी सरास घडताना पाहायला मिळत आहेत. अशी एकच मनाला चटका लावणारी घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. एका ४० वर्षीय तरुणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगवी परिसरातील पीडब्ल्युडी मैदानावर ही घटना घडली. मिलिंद भोंडवे ( वय ४०) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्या मृत्यूने सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानात एका क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान गोलंदाजी करणाऱ्या तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. झटक्यानंतर तो तेथेच कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिलिंद हा भोंडवे हा मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे वास्तव्य करीत होता. मिलिंद भोंडवे हा तरुण शेतकरी कुटुंबातील तरुण होता. आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्याला क्रिकेटची आवड असल्याने तो नेहमी क्रिकेट खेळत होता. या घटनेनंतर परिसरात तसेच क्रिकेट प्रेमी खेळाडूंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies