शिंदे सरदारांच्या गावाचे कुस्ती मैदान महाराष्ट्र केसरी पै.अक्षय कामथे याने जिंकले
May 23, 2024
0
नीरा : पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांचे आणि सैनिकांचे गाव असलेल्या
पिंगोरी गावाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये झालेल्या भव्य कुस्ती
स्पर्धेत शेवटची मानाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पीयन विजेता पै. अक्षय कामथे व
पुरंदर केसरी विजेता पै.रघुनाथ जगताप यामध्ये रंगतदार झाली. तब्बल 45 मिनीटांच्या
चित्तथरारक कसरतीनंतर पै. अक्षय कामथे यांनी पुरंदर केसरी विजेत्यास चितपट करुन
बाजी मारली यामारत हे कुस्ती मैदान जिंकले.पिंगोरी येथील या दोन्ही पैलवानांना यथोचित
सन्मान केला.यावेळी कामथे यांना ५१ हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले.
पिंगोरी(ता.पुरंदर)येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवी यात्रा मोठ्या उत्साहात पार
पडली. यात्रे निमित्त गुरूवार(दि.23) कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला.या आखाड्यात
पुरंदर तालुक्यातील पैलवणासाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली तालुक्यातील १०० हून
अधिक पहिलवानांनी या मैदानात हजेरी लावली होती.यामध्ये २५ कुस्त्या पार पडल्या.
पिंगोरी येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीचा कालपासुन दोनदिवशीय यात्रा उत्सव
मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते. यामध्ये उत्सवमुर्तींची महापुजा, अभिषेक, छबिना आदि भरगच्च
कार्यक्रम संपन्न झाले. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. कुस्ती
आखाड्याचे उदघाटन यात्रा कमिटी अध्यक्ष पोपट शिंदे, माजी उपविभागीय पोलिस अधिकारी
तुकाराम शिंदे, लक्ष्मण कदम, वसंत शिंदे, सुनिल शिंदे, धनंजय शिंदे, रामदास शिंदे
यांच्या हस्ते करण्यात आले.कुस्ती स्पर्धेला परिसरातील कुस्ती शौकिनानांनी मोठ्या
प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. सायंकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान
कुस्त्यांचा आखाडा सुरू झाला. कुस्तीसाठी आखाड्यामध्ये शंभर रूपयांपासुन ते साठ
हजार रूपयांपर्यंत रोख बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी सरपंच संदिप यादव,
सिनेअभिनेते विनोद शिंदे, महादेव कदम, जीवन शिंदे, लालासाहेब शिंदे, सचिन शिंदे,
माजी पोलिस पाटील राहुल शिंदे, कैलास गायकवाड, शशिकांत चौधरी,अजय शिंदे, सागर सुतार
आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शेवटची मान्यवरांच्या हस्ते
महाराष्ट्र चॅम्पीयन विजेता पै. अक्षय कामथे याला 51 हजार रूपयांचे रोख पारितोषिक
देऊन सन्मान करण्यात आला. आखाडा यशस्वी करण्यासाठी प्रकाश शिंदे, ओंकार सुतार,
तुषार शिंदे, ऋतुराज शिंदे, प्रणव शिंदे, किरण शिंदे, निरंजन शिंदे, अक्षय गायकवाड,
विशाल गायकवाड, अक्षय चव्हाण, तुषार गायकवाड, सोहेल इनामदार आदिंनी परिश्रम घेतले.
आखाड्याच्या जागेसाठी महेश गायकवाड यांनी सहकार्य केले. जिल्हा कुस्तीगार संघाचे
पंच पै.तुषार गोळे, पै. आबा जगदाळे यांनी पंच म्हणुन तर निवेदन म्हणुन पै. किसन
काळे यांनी काम पाहिले.श्री वाघेश्वरी देवस्थान कमिटी व श्री वाघेश्वरी तरूण विकास
मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.