मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण, पोलिस स्टेशनला केले हजर, गुन्हा दाखल
May 28, 2024
0
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला घरातून बाहेर काढत जारांगे पाटील समर्थकांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दीपक बद्री नागरे ( वय ३५ ) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुकुंदवाडी परिसरामध्ये मराठा बांधवांचा जमाव गोळा झाला.
यावेळी या संतप्त नागरिकांनी आक्षेपरीय पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली. मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढताना मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. याप्रकरणी नवनाथ डांगे यांनी फिर्याद दिली आहे.