गुरुवारी निरा शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगुल होणार.
निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसणार : तब्बल सहा तास खंडित राहणार.
पुरंदर :
लोणंद येथील अतीउच्च वीजवाहीनीचे पोल बदलण्याच्या कामामुळे निरा शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तब्बल सहा तास खंडित होणार आहे. गुरुवार दि. १८ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागणार असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भरदूपारी वीज पुरवठा खंडित झाल्यावर निरा बाजारपेठेतील व्यावसायिकांचे, रहिवाशांचे हाल होणार असून, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे वेळापत्रक बिघडणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून करण्यात आलेल्या जाहीर आवाहना नुसार दिनांक 18.04.2024 रोजी 220 केवी लोणंद अतिउच्च उपकेंद्र येथून निघणारे 22 केवी निरा अर्बन एजी व 22 केवी निरा ग्रामीण फिडर वरील उच्च दाब पोल बदलवयाचे असल्याने निरा ग्रामीण (नींबूत) शाखा कार्यालयाकडून आवटेज घेण्यात येणार असून खालील फीडर चा वीजपुरवठा दुपारी १२.०० ते सायंकाळी ६.०० वा . पर्यंत खंडित होणार आहे
१. 22 केवी निरा अर्बन
२. 22 केवी निरा अर्बन एजी
सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना विनंती करण्यात येते की महावितरणास सहकार्य करावे.
वास्तविक निरा शहराला सोमेश्वर (ता. बारामती) व लोणंद (ता. खंडाळा) या दोन ठिकाणावरून वीज पुरवठा होत असतो. काही कारणास्तव एका ठिकाचा वीजपुरवठा खंडित होत असल्यास दुसऱ्या ठिकाणचा वीजपुरवठा निरा शहराला देण्याची सोय मागील काळात केली होती. कालांतराने आता एकाच खांबावरुन असा वीजपुरवठा होत असल्याने गैरसोयीचे झाले आहे. गुरुवारी ऐन दुपारच्या वेळेत लोणंद येथून वीजपुरवठा खंडित होत असताना सोमेश्वरची वीज निरा शहराला मिळणे गरजेचे होते. निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका गुरुवारी निरा शहरातील व्यावसायिकांना बसणार आहे.