पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक
जिल्हा कार्यकारणी निवडी विषयी चर्चा.
पुणे :
मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणी निवडीसाठी पुणे येथे बैठक झाली. १९ मे रोजी नवीन कार्यकारिणीची नियुक्ती होणार असून, प्रत्येक तालुक्यातील दोन सदस्य जिल्हा कार्यकारणी सदस्यपदासाठी नियुक्त करण्याच्या सुचना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या नियमानुसार कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने होत असतात. सर्वांनुमते किंवा थेट निवडणूकीच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकरणीची निवड केली जाते. पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणीची मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथील आयबी हॉल येथे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक रविवारी पार पडली.
नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मावळती जिल्हा कार्यकारणी, विविध तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. १७ में पर्यंत जिल्हा कार्यकारणीसाठी इच्छूक सदस्यांची नावे मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्याकडे देण्यात यावीत. या सदस्यांतून परिषदेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणीची नियुक्ती रविवार १९ मे रोजी करण्यात येणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, सचिव गणेश मोकाशी यांनी निवडीबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे संघटक सुनील वाळूंज, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळूंखे, इंदापूरचे सतिश सांगळे, भोरचे सुर्यकांत किंद्रे,संजय इंगुळकर, चाकणचे हनुमंत देवकर, शिरुर तालुका अध्यक्ष संजय बाराहाते, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुरज साळवे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, हवेली अध्यक्ष रमेश निकाळजे, अविनाश आदक, पुणे शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तारे.... बैठकीला उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील लोणकर व प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले. तर आभार राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी मानले.