Type Here to Get Search Results !

मराठा उमेदवार कोणाच्या पथ्यावर ?

 मराठा उमेदवार कोणाच्या पथ्यावर ?


केवळ जातीच्या आधारावर निवडणूक लोकशाहीला घातक 



 नीरा दि.२६ ( राहुल शिंदे )


         मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र उमेदवार देण्याचे जाहीर केल आहे.मात्र त्यांच्या या निर्णयाचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? हे देखील पाहावं लागणार आहे.ज्या सरकारने मराठा आंदोलकांवर लाठी काठी चालवली त्याच सरकारला चालवणाऱ्या पक्षाला याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे उमेदवार हे महायुतीच्या पथ्यावर पडतील आणि येणाऱ्या काळात महायुतीचे उमेदवार निवडून येथील.

यातून मराठा समाजाला फार मोठी चपराक बसणार आहे.

आता वेळ आली आहे.मराठा आंदोलनाची चिक्तीसा करण्याची यातून काय मिळवलं? काय गमावलं ? याचा हिशोब लावण्याची. जरांगे यांनी मुंबईला जाऊन काय आणलं ? आता निवडणूक लढवून काय साध्य करणार ? यावर सुज्ञ मराठा समाजाने विचार करायला हवा. केवळ मेंढरा प्रमाण एखादा नेता मी तुम्हाला हे देतो ते देतो म्हणतोय म्हणून त्याच्या पाठीमागे पाळायला नको.तो यातून काय सध्या करतो आहे. आणि तो सांगतो ते वास्तवाला धरून आहे का हे ही पाहायला हवे.


       मागील वर्षभरात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे.या आंदोलनात अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.तर या आंदोलनात झालेल्या लाठी चार्ज मुळे अनेक जन जखमी झाले आहेत.या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाज सरकारच्या विरोधात उभा ठाकला आहे.मराठा समाजाच्या मनात सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे या निवडणुकीत मराठा समाज महा युतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणार हे निश्चित झाले आहे. त्याच बरोबर हे मतदान महाविकस आघाडीचा विजय सुखकर करेल असही निश्चिती झाले आहे. ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही.आपल्या आंदोलनाची दाखल घेतली नाही. त्याला.धडा शिकवण्यासाठी मराठा समाज या निवडणुकीत एकावटणार आहे. 

      तर मराठा आंदोलनाच्या काळात ओबीसी समाजाला मराठा समजा बद्दल चिथावणी देऊन सरकार मधील मंत्र्यांनी मराठा आणि ओबीसी यांच्या मध्ये मोठी फूट पाडली आहे.मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आता भाजपच्या बाजूला गेला आहे.त्यामुळे भाजपला मोठा मतदार मिळाला आहे. विरोधकांकडे आता काही उरलेला ओबीसी आणि मराठा मतदार शिल्लक राहिला आहे. जातीवर मतदान झाले तर भाजपला ओबीसीचा मोठा फायदा होऊ शकतो.आणि भाजप निवडणुकीत हा मुद्दा नक्कीच पुढे करणार.

       आपण राजकीय भूमिका घेणार नाही म्हणणाऱ्या मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमने आता राज्यात प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक मराठा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्यांनी आम्हाला मराठा आरक्षण दिलं नाही त्या सरकारला आमची ताकद दाखवून देण्यासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आणि सर्व मराठा समाज या उमेदवारांना मतदान करणार. आमचा मतांचा आकडा आणि ताकद दाखऊन देऊ अस मराठा आंदोलक सांगत आहेत. मात्र यातून कोणाची मते कमी होणार आणि कोणाला फायदा होणार हे देखील पाहावे लागणार आहे. केवळ जातीच्या आधारावर निवडणूक लढविणाऱ्या मराठा उमेदवारांना महाराष्ट्रतील इतर समाजातील लोक मतदान करतील का ? तर याच उत्तर नाही असेच असणार आहे.मग खासदार निवडून आणण्या इतकं मतदान मराठा समाजाकडे आहे का ? त्याच उत्तरही नाही असच आहे. कारण मराठा समाज राज्यात ३५ टक्के आहे अस ग्रहीत धरले तरी यातील मोठा समाज वेगवेगळ्या पक्षात विभागाला आहे.त्यामुळे पूर्ण समाज हा जरांगे किंवा मराठा उमेदवारांच्या पाठीमागे येणार नाही.मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस,छगन भुजबळ,गोपीचंद पडळकर,महादेव जानकर अशा नेत्यांनी ओबीसी समाजाची चांगलीच मोठ बांधली आहे.त्यामुळे या समाजाच मोठ मतदान हे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाना मिळणार आहे. त्यामुळे मराठा उमेदवार उभे केले तर आणि मराठा समाजाने केंद्र सरकारला आपली ताकद दाखवण्या साठी मराठा उमेदवाराला मतदान केले तरी महायुतीला त्याचा फायदाच होणार आहे. ओबीसींची मोठे मतदान घेऊन महायुतीला मोठा विजय मिळू शकतो. यामधून सरकारला धडा शिकवण्याचा मराठा समाजच इच्छित साध्य तर होणार नाहीच.पण महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा मतांच महत्त्व देखील संपणार आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप तेच दाखवून देणार आहे.



    फक्त मतांचा आकडा दाखवून जरांगेंना काय सध्या होणार? 


   संपूर्ण मराठा समाजाने स्वतंत्र लढणाऱ्या मराठा उमेदवारांना मतदान करून मराठा समाजाची एक गठ्ठा मते दाखवून देण्याचा प्रयत्न जरांगे करणार असतील तर त्यातून मतांचा मोठा आकडा निश्चित मिळेल.पण त्याचा मराठा समाजाला फायदा काय? तर काहीच नाही. जरांगे यांनी मराठा समाजाच मोठ आंदोलन उभ केलं.लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पण अपेक्षित यश मिळालं का ? तर नाही असच म्हणावं लागणार आहे.कारण सरकारने दिलेल्या आरक्षणावर स्वतः मनोज जरांगे समाधानी नाहीत. त्यामुळेच ते सरकारला धडा शिकवण्याची भाषा करीत आहेत. स्वतंत्र मराठा उमेदवार देऊन सरकारला धडा शिकवू म्हणत आहेत.पण या मुळे सरकारचा पराभव न होता सरकारचा ( महायुतीचा) विजय होण्यातच मदत होणार आहे.पुन्हा महायुतीचे उमेदवार निवडून येणार . मग मराठा आरक्षण न देणाऱ्या आणि आपल्या आया बहिणींना मारहाण करणाऱ्या सरकारला यातून कोणता धडा शिकवला जाणार? मराठा समाजाने निवडणुकीत विरोधी पक्षाच्या लोकांना मतदान केलं तरच त्याचा परिणाम सरकारवर होऊ शकतो. यातून आम्ही सरकार बदलू शकतो एवढा संदेश राज्यकर्त्यांना मिळू शकतो. सत्तेत राहायचं आहे. मात्र लोकसभेसाठी स्वतंत्र मराठा उमेदवार देऊन जरांगे मराठा समाजच मोठ नुकसानच करणार आहेत. हे निच्छित आहे

.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies