मी काँग्रेसची विचारधारा सोडणार नाही : आ.संजय जगताप
पुरंदर मध्ये प्रत्येक मंडल विभागात सुरू होणार चारा छावणी
नीरा दि.२ ( राहुल शिंदे)
मी काँग्रेसच्या विचारधारेचा आहे.मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे.मी आजपर्यंत माझी विचारधारा बदलली नाही आणि यापुढेही मी माझी काँगेसची विचारधारा सोडणार नाही. अस म्हणत आ.संजय जगताप यांनी आपण काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.संजय जगताप हे आज नीरा येथे आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
आ.संजय जगताप हे आज नीरा बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या कांदा बाजाराला भेट देण्यासाठी आले होते.यानंतर त्यांनी पुरंदरच्या दुष्काळ उपाय योजना संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,पुरंदर तालुक्यात आता ७ मंडल निहाय चार छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यां समोरील चाऱ्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी आता तालुक्यात ३६ टँकर सध्या सुरू आहेत तर आणखी १८ गावातून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.त्याच बरोबर हे टँकर भरण्यासाठी जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये सोय करण्यात आली आहे.याबाबत उद्योग मंत्री उदय सावंत यांनी सूचना दिल्या नंतर त्याला परवानगी देण्यात आली आहे.याबद्दल त्यांनी सावंत यांचं आभार मानले .
दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्या बद्दल आमदार संजय जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळ जाहीर केला असला तरी सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्ज वसुली सुरूच ठेवली आहे.त्याच बरोबर वीज वितरांची वसुली देखील सुरूच आहे.त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर विद्यार्थ्यांची फी माफ व्हायला पाहिजे होती. मात्र याबाबतही कार्यवाही झाली नाही. प्रत्येक विभाग वेगळा आदेश येण्याची वाट पाहत आहे.सरकारने याबाबत निर्णय घेण्याची व सबंधित विभागांना सूचना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन
पुरंदर मध्ये सध्या चार टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.रोज किमान ७ हजार टन चारा छावण्यासाठी आवश्यक आहे.त्यामुळे सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन चारा उपलब्ध करून द्यावा असं आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.त्याच बरोबर माहूर येथील तात्या जगताप यांनी ४० एकर मका चारा छावणी साठी देण्याचे सांगितले आहे त्याबद्दल जगताप यांनी त्यांचे आभार मानले.
मी काँग्रेस सोडणार नाही : चर्चांना पूर्णविराम
मी काँग्रेस विचारधारेचा स्वीकार केला आहे.माझ्या वडिलांनी सुद्धा काँग्रेसची विचारधारा स्वीकारली होती.ती त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही.मीसुद्धा माझ्या विचार धारेशी कायम राहणार आहे.मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. कितीही मोठं संकट आले. किंवा कोणताही सहकारी मला सोडून गेला तरी मी मात्र काँग्रेस मध्येच आहे आणि काँग्रेसच राहणार. खा.सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावं त्यांच्यात फूट पडू नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्हाला त्यात यश आले नाही.पण एखाद्याच्या घरात फूट पडली म्हणून त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजरे आम्ही नाही. मला कोणी सोडून दुसऱ्या पक्षात गेले म्हणजे मी जाणार अस ही नाही. मी माझ्या विचार धारेवर ठाम असल्याचे म्हणत जगताप यांनी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले.