जरांगे पाटीलांच्या दीर्घायुष्यासाठी नीरेतील दत्त घाटावर प्रार्थना.
युवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या तर काही अश्रू अनावर.
पुरंदर :
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सहा दिवस. माध्यमातून आज त्यांची तब्येत खालवल्याचे दाखवल्यानंतर नीरा येथील मराठा बांधवांनी एकत्रीत येत प्रसिद्धी दत्त मांदिरात आरती केली. जरांगे पाटलांची तब्यातीत सुधारणा व्हावी व ते दिर्घायुष्यी व्हवे यांची प्रार्थना केली.
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे. जरांगे यांची तब्येत खालावलमुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र जरांगेनी ते सलाईन काढून टाकली. जरांगेंच्या उपोषणस्थळाची बातमी माध्यमातून पाहिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव गहिवरून गेले आहेत. नीरेतही युवकांना अश्रू अनावर झाले होते.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काल बुधवारी राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. नीरा येथील आठवडे बाजार असल्याने मराठा बांधवांनी बंदची भुमिका मागे घेतली. पण आज गुरुवारी दुपारी चर्चा करून सायंकाळी जरांगे पाटीलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी नीरा नदीतील प्रसिद्धी दत्तघाटावर एकत्रीत येत. आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, काही युवकांना अश्रू अनावर झाले तर काहींंनी मराठा राजकारण्यांना खडेबोल सुनावले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते टि.के. जगताप, सचिन मोरे, मंगेश ढमाळ, अजित सोनवणे, दयानंद चव्हाण, कौस्तुभ पवार, शिवकन्या समृद्ध देशमुख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. चंद्रशेखर पवार, सचिन कदम, आबा घुले, कुलदीप पवार, दत्ता निंबाळकर, किरण बोधे आदी मराठा बांधव उपस्थित होते.