भोसलेवाडी येथे गावठी दारूच्या भट्टीवर जेजुरी पोलिसांची कारवाई
जेजुरी दिनांक २८
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोसलेवाडी येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी जेजुरी पोलिसांनी उध्वस्त केली आहे.यामध्ये 298150 रुपयाचे रसायन,तयार दारू आणि गावठी दारू बनवण्याच साहित्य पोलिसांनी नष्ट केले आहे.तर याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रविण श्रीमंत शेंडेयांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भारतीय दंड विधान कलम 328 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 चे कलम 65 फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी ही कारवाई आज रात्री म्हणजेच दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे १.४५ वाजता केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरीश्चंद्र अण्णा राठोड वय 42 वर्षे रा भोसलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या कारवाई मध्ये पोलिसांनी 245 लिटर तयार दारू ,सरपण आणि 7000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.