राहुल नार्वेकर संजय जगताप यांच्यात खलबते
सासवड नगरपालिकेला दिली भेट
सासवड (प्रतिनिधी)
देशात सध्या लोकसभेचे पडघम वाचण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विधान सभेचे आध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची भेट घेतली आहे.त्यामुळे पुरंदर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुरंदरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी तब्बल दोन ते आडीच तास विधान सभेचे आध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खलबत केली. वास्तविक राहुल नार्वेकर यांचा नियोजित दौरा हा मुंबई ते सासवड येथील वाघिरे कॉलेज व हेलीपॅड ते सासवड येथील शासकीय विश्राम गृहातुन तेथून जेजुरी आसा होता. परंतु हेलिपॅड वरुन ते थेट आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी गेल्याने चर्चाला उधाण आले
या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जगताप हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक राहूल नार्वेकर यांनी संजय जगताप यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नाही. याबाबत आमदार संजय जगताप यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सासवड नगरपालिकेला मिळालेल्या स्वच्छता पुरस्काराबद्दल राहुल नार्वेकर यांनी सासवड नगरपालिकेतील अधिकारी यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार संजय जगताप उपस्थित होते.