जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अनिल सौंदडे यांची निवड
पुरंदर दि.१८
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबाच्या मार्तंड देव संस्थांचे प्रमुख विश्वस्तपदी अनिल सौंदंडे यांची निवड करण्यात आली आहे. आज रविवारी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जेजुरी येथे ही निवड जाहीर करण्यात आली.
जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ही निवड करण्यात आली. जेजुरी येथील देवस्थानाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अनिल सौंदडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडी नंतर विश्वस्त व जेजुरीच्या नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. निवडी नंतर बोलताना सौंदडे म्हणाले की , देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याबाबत उपाय योजना करण्यावर आपला भर असेल, असेही ते म्हणाले.....