Type Here to Get Search Results !

"परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त जायला हवे" : प्रा. डॉ. अजय दरेकर चौगुले क्लासेसच्या वतीने बोर्ड परीक्षा मार्गदर्शन व करीयर व्याख्यान संपन्न.

 "परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त जायला हवे" : प्रा. डॉ. अजय दरेकर


     चौगुले क्लासेसच्या वतीने बोर्ड परीक्षा मार्गदर्शन व करीयर व्याख्यान संपन्न.





पुरंदर :
      "पालकांनी परीक्षेदरम्यान मुलांचे मनोबल कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्याला कुठलाही ताण तणाव येणार नाही याची काळजीही घ्यावी. सर्वच विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी यामध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. जागा खूप मर्यादित असतात; परंतु या व्यतिरिक्तही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठलाही ताणतणाव न घेता परीक्षेस सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी यापुढे सेल्फ स्टडीला महत्त्व द्यावे." असे मत प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी व्यक्त केले.

     नीरेतील चौगुले क्लासेसच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा तयारी मार्गदर्शन व करियर व्याख्यान श्री समर्थ पतसंस्था येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. दरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्या राधा माने,  स्वामी विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वरचे संस्थापक गणेश सावंत, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, आर पी आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, सचिन मोरे, सुभाष पवार, उन्मेष कदम, विजय सपकाळ यांसह क्लासेस मधील ३०० विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

         प्रा. दरेकर यांनी विद्यार्थ्यांना थ्री इडीयट्स फिल्म मधील डायलॉग सांगून विद्यार्थ्यांचे माईंड फ्रेश ठेवण्याचे मार्गदर्शन केले. आपण पेपरला सामोरे जाताना पेपर लिहिताना लागणारे साहित्य तसेच प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यावा याचे देखील मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अत्यंत गरीब कुटुंबातील पोलीस अधिकारी म्हणून बारामती तालुक्यातील होळगावचे सागर होळकर यांनी देखील त्यांचा जीवन संघर्षमय सांगत मी पोलीस खात्यात पीएसआय या पदावर कसा विराजमान झालो याचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        त्याचप्रमाणे दोन वेळा एम.पी.एस.सी पास झालेले ज्ञानेश्वर मदने यांनी त्यांचा जीवन संघर्ष सांगताना स्वतः अपंग असताना देखील हार न मानता उच्च शिक्षण घेऊन मंत्रालयात क्लार्क या पदापर्यंत पोहोचलो असे सांगत भविष्यात तुम्ही विद्यार्थी माझे सहकारी अधिकारी म्हणून लाभताल अशीही अशा व्यक्त केली.

         या सर्व वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकून चौगुले क्लासेस मधील ३०० विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच नीरेत राबवत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा माईंड कसा सेट करता येईल त्यांच्या डोक्यावरचा तणाव कसा कमी होईल यासाठी प्रयत्न केले. प्रतीक चौगुले यांचे आभार व्यक्त केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज शहा यांनी केले. तर, आभार नितीन भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies