माहूर मेळाव्यात होणार 'लोकशाही' वरील बंदीचा निषेध
पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा करणार निषेधमुंबई :
चॅनलवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'लोकशाही' न्यूज चॅनलवरील बंदीची कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे. १३ जानेवारी रोजी माहूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात सर्व पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा निषेध करतील अशी माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली आहे.
लोकशाही न्यूज चॅनलवर सरकारने आज अचानक एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. यापुर्वी देखील सरकारकडून असा प्रयोग झाला होता. व्यवस्था विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकशाहीवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज तर बंद करीत आहेच. त्याचबरोबर माध्यमांवर दहशत निर्माण करून अंकुश ठेवण्याचा ही प्रयत्न करीत आहे. सरकारची ही कारवाई कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही.
मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेसह विविध पत्रकार संघटनांनी याचा निषेध केला आहे.

मात्र एवढ्यावरच न थांबता मराठी पत्रकार परिषदेच्या माहूर मेळाव्यास येणारा प्रत्येक पत्रकार काळ्या फिती लावून या ठोकशाहीचा निषेध करेल. असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आज बुधवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी आणि जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लोकशाहीवरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.