तंटामुक्ती अध्यक्षपदी जयवंत भुजबळ, उपाध्यक्षपदी महावीर भुजबळ बिनविरोध निवड.
वाल्हे (दि.२७) वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जयवंत बाबुराव भुजबळ तर, उपाध्यक्षपदी महावीर यशवंत भुजबळ यांची बिनविरोध करण्यात आली. वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडलेल्या ग्रामसभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.
यावेळी, माजी अमोल खवले, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, प्रा. संतोष नवले,अमोल भुजबळ, हनुमंत पवार, दादासाहेब राऊत, निलेश पवार, राजेंद्र पवार, संतोष भुजबळ, अनिल भुजबळ, शंकर भुजबळ आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यादरम्यान, वाल्हेकर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच अमित पवार यांच्या हास्ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ, उपाध्यक्ष महावीर भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.