सोमेश्वर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचा ऊस पहिला तोडावा: महेश जेधे - आम् आदमी पार्टी
नीरा दि.१२
सोमेश्वर कारखान्याच्यावतीने सध्या गाळपासाठी गेटकेन ऊस मोठ्या प्रमाणात आणला जात आहे.मात्र त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून,अनेक सभासद शेतकऱ्यांचे उसाचे पीक २० महिने शेतात उभे आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सभासद शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखाना प्रशासनाने सभासदांचा ऊस पहिला तोडावा, नंतर गेट केन ऊस आणावा. अशी मागणी आम् आदमी पार्टीचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष महेश जेधे यांनी केली आहे. कारखाना प्रशासनाने जर सभासदांच्या उसाला प्राधान्य दिले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
गुरुवारी (दि.११) रोजी आम् आदमी पार्टी पुरंदर तालुका यांच्यावतीने सभासदांच्या उसाला प्राधान्य देऊन तो प्रथम तोडला जावा अशी मागणी मारणारे निवेदन आम् आदमी पक्षाच्या वतीने कारखाना प्रशासनाला देण्यात आले आहे.. यामध्ये सभासदांचे ऊस तातडीने नेहण्या बाबत विनंती करण्यात आली आहे.पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातच ऊस वाळून जात आहेत.त्यामुळे उसाचे वजन घटत आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.मात्र कारखाना प्रशासन जास्तीत जास्त बिगर सभासद ऊस आणत आहे.त्यामुळे कारखान्याचा मालक असलेला सभासद शेतकरी डावलला जात आहे. त्याचा स्वतःचा कारखाना असताना देखील त्याचा ऊस तुटत नाही.काही शेतकऱ्यांचा ऊस २०: २० महिने शेतात आहे.त्यामुळे सभासद शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.त्यामुळे सभासद शेतकर्यांचा ऊस प्राधान्याने न तोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेश जेधे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी नीरा येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दि
ली आहे.