पुणे जिल्ह्यातील ३०६ पत्रकारांची आरोग्य तपासणी
मराठी पत्रकार परिषदेचा ८५व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
पुणे :
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी केलेल्या आव्हानानुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, चाकण या पत्रकार संघांनी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी केली. रविवार दि. ३ रोजी ३०६ पत्रकारांनी या शिबिरात सहभागी होत तपासणी केली.
मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केलेल्या सूचनेनुसार ३ डिसेंबर २०२३ रोजी सर्व महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यामधील रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. तालुक्यातील शिबिराची जबाबदारी त्या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि तालुका पदाधिकारी यांनी समर्थपणे पेलली. यामध्ये पुरंदर तालुका पत्रकार संघ- ३५, आंबेगाव तालुका पत्रकार संघ ६८, इंदापूर तालुका पत्रकार संघ- २५, बारामती तालुका पत्रकार संघ २२, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण १५, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ ८५,दौंड तालुका पत्रकार संघ १२, जुन्नर तालुका पत्रकार संघ २०,हवेली तालुका पत्रकार संघ २४ पत्रकारांची तपासणी झाली. ४ डिसेंबर रोजी शिरूर तालुका पत्रकार संघ व भोर तालुका पत्रकार संघ, वेल्हे तालुका पत्रकार, संघ, पुणे शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ येत्या आठवड्यामध्ये पत्रकारांची तपासणी करून घेणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्यासह विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व सोशल मिडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनसह पुणे जिल्हा पत्रकार संघ व सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणी यांनी सर्व तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दि
ल्या आहेत.