कृषी विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पुष्पांजली भोसलेचां नीरा ग्रामस्थांनी केला सत्कार
नीरा दि.१२
नीरा ता. पुरंदर येथील तरुणी पुष्पांजली भोसले हिने नुकतीच कृषी विषयात पी.एच.डी. अर्थात डॉक्टरेट प्राप्त केली आहे.कमी वयात तिने हे यश संपादन केले आहे.शेतकऱ्यांच्या मुलीने शेती क्षेत्रातच संशोधन करीत डॉक्टरेट मिळवल्याने नीरा येथील ग्रामस्थांनी पुष्पांजली भोसले हीचा आज नीरा ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान केला.
नीरा येथील शेतकरी व नीरा शहराचे एके काळी उपसरपंच राहिलेल्या बाळासाहेब भोसले यांची कन्या पुष्पांजली भोसले हिने कृषी विभागात निशिगंधाच्या फुलांच्या सुगंधा बाबत संशोधन केले.त्यात तिने डॉक्टरेट संपादित केली .नीरा येथील नीरा विकास आघाडी व नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने नीरा ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मी पूजनाचे निमित्त साधत तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ सहितिक व.बा.बोधे, नीरा शहराच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरा विकास आघाडीचे मार्गदर्शक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना गुरुजी,माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, अभी भालेराव,अनिल चव्हाण, संदीप धायगुडे,आनंद शिंदे,प्रमोद काकडे, विराज काकडे,राष्ट्रवादीचे कांचन निगडे,दीपक ककडे, सुदाम बंडगर, विजय शिंदे, रामराजे कुंभार डायाभाई पटेल. संदिप जावळे ,वाडेकर,योगेंद्र माने. यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की,पुष्पांजलीने अत्यंत कमी वयात मोठे यश मिळवले आहे.ती आता नीरा आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा असणार आहे. तिच्यामुळे तिच्या कुटुंबाचे नाव मोठे झालेच आहे. त्याच बरोबर नीरा गावाचा मानही उंचावला आहे.
तरुणांनी अशा प्रकारे आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी व. बा. बोधे,चंद्रकांत धायगुडे,अनिल चव्हाण, सरपंच तेजश्री काकडे यांनी पुष्पांजलीचे कौतुक केले.