Type Here to Get Search Results !

महात्मा फुले उद्योगरत्न पुरस्काराने हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह सन्मानित

महात्मा फुले उद्योगरत्न पुरस्काराने हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह सन्मानित





पुरंदर (प्रतिनिधी) : दि.२९

        भिवरी( ता.पुरंदर) येथील सुनील लोणकर, संदिप लोणकर, सुभाष लोणकर, गणेश लोणकर या लोणकर बंधूंच्या हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूहास खानवडी (ता. पुरंदर) येथे १६ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले मराठी प्रबोधन साहित्य संमेलनात भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, संमेलनाध्यक्षा डॉ. स्वाती शिंदे- पवार, पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश जगताप, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या शुभहस्ते हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूहाचे संचालक संदिप पांडुरंग लोणकर यांना महात्मा फुले उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सन्मान सोहळा वितरण प्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमतचे पत्रकार, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा संचालक सुनील लोणकर, अजिंक्यतारा पान शॉपचे मालक पंढरीनाथ उर्फ पिंटूशेठ कटके, भैरवनाथ पूजा भांडारचे मालक शिवाजी उर्फ बाबू शेठ कटके आदींसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

     सासवड -कोंढवा रस्त्यावरील भिवरी गावी असलेले लोणकर बंधूंचे हॉटेल लोणकरवाडा फॅमिली रेस्टॉरंट व मिसळ अँड स्नॅक्स सेंटर तसेच बाबदेव घाटमाथ्यावरील नव्याने सुरू केलेले लोणकरवाडा मिसळ अँड स्नॅक्स सेंटर अल्पावधीत ग्राहकांच्या अव्वल पसंतीचे, हक्काने जेवण्याचे, नाष्ट्याचे ठिकाण ठरले आहे. ग्राहकांचा प्रतिसाद, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच खरा नफा हे सुञ तंतोतंत पालन करत, विविध खवय्ये शौकीनांना अस्सल गावरान चवीचे खाद्यपदार्थ देण्यात यशस्वी ठरलेल्या लोणकर बंधूंच्या हाॅटेल लोणकरवाडा उद्योग समूहास,खाद्यपदार्थांचा दर्जेदारपणा, ग्राहकांना, उत्कृष्ट सेवा, नम्रतापूर्वक वागणूक, स्वच्छता, टापटीपपणा या बाबींचा विचार करून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies