घरकुल दीर्घकथेचे १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन
नीरा ता.१२
प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी, कथाकार प्रविण अशोकराव जोशी यांच्या आगामी घरकुल या दीर्घकथेचे प्रकाशन गुरुवार (ता.१६) नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. नीरा (ता.पुरंदर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सायंकाळी ७:०० वाजता पुस्तक प्रकाशन होणार आहे.
सनदी अधिकारी व जिल्ह्याचे आयकर आयुक्त इनकम टॅक्स डॉ. नितीन वाघमोडे तसेच मुगुटराव साहेबराव काकडे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. यासाठी पंचायत समिती माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. जगदीश शेवते, टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. महादेव रोकडे, शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. वैजीनाथ राख, व्याख्याते डॉ. प्रदीप पाटील, लेखक संतोष शेंडकर, बारामती सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील ऍड. बापूसाहेब शिलवंत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जगताप, कांचनदादा निगडे, उत्तमराव निगडे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशन ठिकाणी लेखकाची इतर पुस्तके माफक दरात उपलब्ध होणार असून प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अमोल निगडे, आदित्य कोंडे यांनी केले आहे.