गावकारभारी व्हाचय ! लागा कामाला.
पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले.पुरंदर :
राज्यभरात गेली वर्षभरापासून रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अखेर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. एक महिन्याचा निवडणुक कार्यक्रम असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यभरात ग्रामपंचायतीच्या नव्याने स्थापित झालेल्या तसेच २०२२ मध्ये चुकीच्या प्रभाग रचना योजना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसह या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर ९ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोट निवडणूका जाहीर झाल्या आहेत.
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हा, बागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी व एखतपुर-मुंजवडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
पुरंदर तालुक्यातील या गावात पोट निवडणूका होणार ..
ग्रा. नाव प्रभाग क्र. प्रवर्ग
नायगाव. १. सर्वसाधारण
पांढे. १. सर्वसाधारण
पानवडी. १. सर्वसाधारण स्त्री
सुपे खु. १. अनुसूचित जमाती
राख. २. सर्वसाधारण
घेरापुरंदर. १. अ. जमाती स्त्री
घेरापुरंदर. २. अ. जमाती स्त्री
घरापुरंदर. १. ना.मा.प्र. स्त्री
पांगारे. १. ना.मा.प्र. स्त्री
निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
२५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.