नीरा येथे गुरुवारी रस्ता रोको : जरांगेंची तब्बेत खालवल्याने मराठा समाज आक्रमक
नीरा दि.३०
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नीरा येथे गुरवारी सकाळ पासून पुणे पंढरपूर मार्गावर रस्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे.तत्पूर्वी उद्या मंगळवार पासून ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.आज सोमवारी नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात मराठा समाजाची एक बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्बेत खालावली असल्याने आता मराठा समाज हवाल दिलं होताना पाहायला मिळतो आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जरांगे यांना जर काही झाले तर काय ? अस प्रश्न आता सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. सरकारला जरांगे यांना मारायचे आहे काय ? असा सवाल लोकांनी व्यक्त केला आहे.सत्ताधारी आणि विरोधक या दोघां विरोधात आता मराठा तरुण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षातील मराठा बांधव उपस्थित होते. गरज पडल्यास आपापल्या राजकीय पक्षाचा राजीनामा देण्याबाबतही यामध्ये चर्चा करण्यात आली. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. जर कोणत्या मराठा नेत्याला आरक्षणाची गरज नसेल तर आरक्षण घेऊ नका.पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नका. असा इशारा यावेळी देण्यात आला. रामदास कदम व नारायण राणे यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नीरा, निंबुत,राख, गुळूंचे,जेऊर, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी,मांडकी या भागातील लोक बैठकीला उपस्थित होते.
तर या रस्ता रोको आंदोलनात सर्वच जातीच्या लोकांनी सहभागी व्हावे आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. तर कोणत्याही राजकीय नेत्याने गावात येऊ नये.