सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू
५ नोव्हेंबर पासून धावणार : पुण्यात पोहचणार सकाळी...पुरंदर : कोव्हिड काळात रेल्वे बंद झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर गेली दोन वर्षांत सह्याद्री एक्स्प्रेस बंद होती. वेळोवेळी रेल्वे प्रशसनाला पत्रव्यव्हार करुनही प्रतिसाद मिळत नव्हता. नुकतेच पुणे विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सह्याद्री एक्स्प्रेस बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रात्री धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईत सकाळी अकराच्या सुमारास पोचत असे. सायंकाळी सहा वाजता पुन्हा कोल्हापूरकडे रवाना होत असे. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी नीरा शहरात पहाटे साडेचार वाजता येत असे व मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास येता ये होती. यामुळे नीरा शहरासह पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यातील शंभर गावातील व्यावसायिक, नोकरदार यांना मुंबईला जाऊन यायला सोईची होती. दिवसभराचे काम करुन पुन्हा नीरेत येता येत होते. पण गेली दोन वर्षांपासून ही गाडी बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.
आता पुन्हा सह्याद्री एक्स्प्रेस (गाडी क्र. १०२३/१०२४) नव्या वेळेत सुरु केली आहे, पण ती कोल्हापूर - पुणे दरम्यान धावणार असल्याने प्रवाशांनी काहीसे समाधान व्यक्त केले आहे. ०५ नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर येथून रात्री ११:३० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे. मिरज ००:३५, कराड ०२:०७, सातारा ०३:५७, नीरा ०५:१३, पुणे ०७:४५ येथे पोहोचेल. पुणे येथुन रात्री रात्री ०९:४५ वाजता कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. नीरा येथे ११:१४, सातारा ००:२२, कराड ०१:३५, कोल्हापूर येथे ०५:४० वाजता पोहोचेल.