गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या रिंगणात किती उमेदवार व कोण.
उद्या पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार आहे. सात सदस्यांच्या जागांसाठी ३३ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते. आज बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे १८ अर्ज व सरपंचपदासाठीचे ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १५ व सरपंच पदासाठी दोन अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
श्री. ज्योतिबा ग्रामपरिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सुवर्णा तानाजी महानवर. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण दिपक रामचंद्र भोसले, सर्वसाधारण महिला राखीव आशा सचिन चव्हाण, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रतिक्षा रामचंद्र गदादे. प्रभाग २ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण नंदकुमार वसंतराव निगडे, सर्वसाधारण महिला राखीव स्वप्नाली विराज निगडे. प्रभाग ३ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण अरविंद गुलाबराव निगडे, सर्वसाधारण महिला राखीव अनिता जगन्नाथ कर्णवर.
ज्योतिबा ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार अहिल्याबाई शंकर वाघापुरे. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठीचे सर्वसाधारण जागेसाठी अनिल गणपत निगडे, सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी प्रियंका रणजीत निगडे, नागरिकांचा मागासप्रवर्ग प्रतीक्षा सागर महानवर. प्रभाग क्रमांक २ मधुन सर्वसाधारण अशोक ज्ञानेश्वर निगडे, सर्वसाधारण महिला राखीव जागा अनिता सत्यवान निगडे. प्रभाग क्रमांक ३ मधुन सर्वसाधारण कपिल मारुती कोंडे, सर्वसाधारण महिला राखीव अलका अरविंद कर्णवर.
कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधुन सर्वसाधारण जागेसाठी मेघराज सुधाकर निगडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत
गुळूंचे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ सदस्यांच्या जागांसाठी ३९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले होते. आज बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे २० अर्ज व सरपंचपदासाठीचे ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १९ व सरपंच पदासाठी ३ अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
गुळूंचे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निर्मला उत्तम निगडे, सम्राज्ञी कौस्तुभ निगडे व सीमा विजय निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग १ मधुन सदस्य पदासाठी नागरिकांचा मागासवर्ग महिला शितल शेखर कर्णवर, पौर्णिमा महेश गायकवाड, सर्वसाधारण महिला हेमलता हणुमंत निगडे, वंदना सोमनाथ मुळीक, सर्वसाधारण किरण प्रल्हाद निगडे, दिपक आनंदराव निगडे. प्रभाग २ मधुन अनुसूचित जाती नितीन जयंत गायकवाड, ज्ञानेश्वर शंकर पाटोळे, सर्वसाधारण महिला कविता शंकर निगडे, रेश्मा तानाजी निगडे, सर्वसाधारण अक्षय विजय निगडे, गणेश नथुराम निगडे, तानाजी बजाबा निगडे. प्रभाग ३ मधुन नागरिकांचा मागासप्रवर्ग निखिल उत्तमराव खोमणे, वैशाली राजेंद्र फरांदे, सर्वसाधारण महिला राखीव अमृता नितीन निगडे, आरती भगीरथ निगडे, मनिषा अनिल निगडे, वैशाली राजेंद्र निगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
गुरवार (दि. २६) पासुन निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. रविवार (दि.०५) रोजी मतदान होणार आहे तर सोमवार (दि.०६) रोजी सासवड येथे मतमोजणी होणार आहे.