पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध
पुरंदर तालुक्यात तीन ग्रामपंचायती बिनविरोध
सासवड (पुढारी वृत्तसेवा) ता २५ : पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे.
आज आर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामांचायातीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला.तर इतर उमेदवारांनी आपले आर्ज माघारी घेतले.त्यामुळे वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिन विरोध झाली तर आडाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यात आले नव्हते त्यामुळे ही ग्रामपंचायती बिनविरोध झाली आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अतुल सोमनाथ गायकवाड यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर सदस्यपदी तेजस बाळासाहेब दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ, साम्राज्ञी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ, अमित धनंजय पवार, पूर्वा राजेंद्र राऊत, कविता सतिश पवार, सागर मदन भुजबळ, प्रमिला नवनाथ पवार, हरी प्रल्हाद दुबळे, अमोल शंकर पवार, शितल दादा मदने, वैशाली दादासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्याच बरोबर सुकलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी संदेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दर सदस्य म्हणून प्रतीक्षा भाऊसाहेब चव्हाण, योगेश मारूती पवार, ऊर्मिला दिलीप पवार, नितीन महादेव गावडे, हर्षदा नितीन पवार, वैजयंती दत्तात्रेय दाते, अमोल अरूण पवार, दत्तात्रेय किसन पवार, अश्विनी कुंडलिक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आडाचीवाडी ग्रामपंचायतीची निवडणुकाही बिनविरोध झाली असून विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी विरोधात अर्ज भरण्यात आलेच नव्हते. त्यामुळे सुवर्णा बजरंग पवार, यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे तर शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार, लता बाळु पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार, अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसो पवार यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तर तालुक्यात सध्या आणखी १२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे. यासाठी रविवारी (दि.५) नोव्हेंबर रोजी ममतदान प्रक्रिया पार पडणार असून सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान करता येणार आहे. सोमवार (दि.६) नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.