मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा ग्रामीण पत्रकारांशी संवाद, सेलू पत्रकार संघाचा पुढाकार
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पहिली व सर्वसमावेशक राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी यांच्या वतीने 11 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सेलू येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित सर्व पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन करत येणाऱ्या भविष्य काळात प्रसार माध्यमामध्ये डिझीटल मीडिया हे माध्यम कसे प्रभावी ठरणार आहे, या बद्दल माहिती दिली.
तसेच साप्ताहिक, ज्येष्ठ पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य विमा, पत्रकारांवर वाढते हल्ले, अशा अनेक पत्रकारांच्या निगडित असलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, बीड उपाध्यक्ष रवी साबळे, डिझीटल मीडिया परिषद राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभू दिपके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, महानगर अध्यक्ष दत्तात्रय कराळे, महानगर सहसचिव तथा डिझीटल मीडिया परिषद परभणी प्रमुख प्रमोद अंभोरे, प्रेस फोटोग्राफर संजय घनसावंत आदींची विशेष उपस्थिती होती. तसेच संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी शेख मोहसीन, नारायण पाटील, मोहमद इलियास, किशोर कटारे, निसार पठाण, पुनमचंद खोना, रामेश्वर बहिरट, शिवाजी शिंदे, कांचन कोरडे, दिलीप मोरे, डॉ.विलास मोरे, सतीश आकात, राहुल खपले, निसार पठाण आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची प्रास्तविक शेख मोहसीन यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी व आभार निसार पठाण यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.