निरा नदीत ४ हजार २३० क्युसेक्सने पाणी सोडले
पुरंदर :
गेली दोन दिवस निरा देवघर धरणसाळीत पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरल्याने धरणातून ४ हजार २३० क्युसेक्सने विसर्ग सुरू झाल्याची माहिती निरा पाटबंधारे उपविभागाकडून सकाळी सात वाजता देण्यात आली आहे.
महत्त्वाची सूचना
निरा देवघर धरण
दिनांक: १०-०९-२०२३
निरा देवघर प्रकल्प , ता. भोर, जि. पुणे
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने निरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले आहे त्यामुळे *धरणातून नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या २४९० क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून ठीक सकाळी ७:०० वाजता धरणाच्या सांडव्या वरून ३४८० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक एकूण ४२३० क्यूसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
यो. स. भंडलकर
सहाय्यक अभियंता, श्रेणी १
निरा पाटबंधारे उपविभाग, निरा
ता. पुरंदर, जि. पुणे