नीरा येथील वार्ड नंबर ६ चा गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला रस्त्याच्या प्रश्न मिटला.
सदस्य आपाल्यादारी उपक्रमाचे फलित
नीरा :
नीरा (ता. पुरंदर) येथील वार्ड नंबर सहा मध्ये लोकांना रस्त्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत होते. मात्र हा प्रश्न आता मिटला असून नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे व जेष्ठ नागरिक यशवंत जाधव यांच्या हस्ते आज गुरुवारी सुमारे दीड किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
नीरा येथील वार्ड नंबर सहा मधील घरांचे बांधकाम अत्यंत अस्तव्यस्त पद्धतीने झालं होतं. या वार्डामध्ये घरी जाण्यासाठी लोकांना केवळ पायी मार्ग होता. मात्र नीरेच्या सरपंच तेजस्वी काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच दीपक काकडे यांच्या प्रयत्नातून यावर मार्ग निघाला आहे. मागील काळात नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने सदस्य आपल्यादारी हे अभियान राबविण्यात आलं होत. या अभियानांतर्गत प्रत्येक वार्डामधील समस्या जाणून घेऊन, सदस्यांच्या मार्फत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार होता. त्याचाच एक भाग म्हणून नीरा येथील वॉर्ड नंबर ६ मध्ये रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात ग्रामपंचायतीच्या सदस्यांना यश आले आहे. अनेक घरांना जाण्यासाठी रस्ता नव्हता. यावर पर्याय म्हणून निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून समन्वय साधून ज्युबिलंट कंपनीच्या बाजूने सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून जागा उपलब्ध करून दिली, सुमारे पंधरा फूट रुंदीचा रस्ता या भागातून होत असल्याने या भागातील सुमारे दोन हजार नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलाय आहे. मागील पन्नास वर्षापासून या भागातील लोकांना या ठिकाणी जाण्यासाठी केवळ पाऊल वाटेचा वापर करावा लागत होता. मात्र आता या भागात हा रस्ता होतो आहे. याचे उद्घाटन सरपंच तेजश्री काकडे व जेष्ठ नागरिक यशवंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, राधा माने, वैशाली काळे, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, अनंता शिंदे, प्रियंका झुंजरे, संदीप धायगुडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, नंदकुमार शिंदे, सुदाम बंडगर, संदिप जावळे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे ग्रामसेवक रमेश राऊत, तलाठी सुनील पाटोळे, कोतवाल अप्पा लकडे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी उपसरपंच दीपक काकडे म्हणाले की, वार्ड नंबर सहा मधील सर्व समस्याया आमच्या समस्या असतील आणि या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तर ग्रामस्थांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल सरपंच तेजश्री काकडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.